PM Kisan Samman Nidhi : मोदींनी किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता जारी केला, 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी ट्रान्सफर, नैसर्गिक शेतीवर जोर
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जारी केला. त्यांनी तामिळनाडूतील कोइम्बतूर येथून देशभरातील ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली.