Prashant Padole : शेतकऱ्यांचे हक्क दिले नाही तर तुम्हाला उडवून देऊ; काँग्रेस खासदाराची थेट पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना धमकी
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. परतीच्या पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करताना पडोळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीवजा इशारा दिला आहे.