Bachchu Kadu : बच्चू कडूंचा इशारा- शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली केल्यास ठोकून काढू, बँक मॅनेजरला फोनवरून धमकी
राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर अद्याप सरकारकडून ठोस पावले उचलली गेली नसतानाच दुसरीकडे बँकांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याने माजी मंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत. अमरावतीमध्ये एका बँक मॅनेजरला थेट फोन करून ‘शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली केली, तर तिथेच ठोकून काढू!’ अशी इशारा वजा धमकी बच्चू कडू यांनी दिली.