Raju Shetti : राजू शेट्टींचा इशारा- शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, अन्यथा कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही!
अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला कडक इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत द्या, अन्यथा किमान 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे तिप्पट नुकसानभरपाई द्या. दिवाळीपूर्वी ही मदत न मिळाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सर्व सरकारी अधिकाऱ्यांची दिवाळी नीट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.