• Download App
    farmer onion crisis committee | The Focus India

    farmer onion crisis committee

    Onion Price : कांदा दर कोसळल्याने सरकारचे पाऊल, 50 पैसे किलोपर्यंत घसरलेल्या भावांवर तोडगा शोधण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती; 15 दिवसांत अहवाल

    राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून दरघसरणीच्या मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर महत्त्वाचे पाऊल उचलत कांदा दरातील घसरणीवर उपाय शोधण्यासाठी पाच तज्ज्ञ सदस्यांची विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीला अवघ्या 15 दिवसांत सविस्तर अहवाल आणि शिफारशी सरकारकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    Read more