Radhakrishna Vikhe Patil : आधी सोसायटी काढायची,मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
भाजपचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शेतकरीविरोधी वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं, हे वर्षानुवर्षं सुरू आहे, असं विधान विखे पाटील यांनी केल्याने शेतकरी संघटनांकडून आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.