Marathwada : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 346 कोटी 31 लाख 70 हजारांचा दिलासा; अध्यादेश जारी, दिवाळीनंतरच खात्यात येणार
मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीचे वितरण दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.