Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले- निवडणूक जाहीर झाली की राज ठाकरेंसोबत चर्चा करू
अनेक वर्षांनी आम्ही दोघे एका व्यासपीठावर एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. परंतु, त्यानंतर राज ठाकरे यांनी युतीबद्दल सावध भूमिका घेतली असून मराठीच्या मुद्यासाठी आम्ही एकत्र आलो असून यात राजकीय मुद्दा नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक जाहीर होऊ द्या, मग चर्चा करू शकतो.