Don 3 : ‘डॉन 3’ चित्रपटाचा वाद चिघळला,, रणवीर सिंग-फरहान अख्तर आमने-सामने, ₹40 कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा
बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेल्या ‘डॉन 3’ वादाची आग आता आणखी भडकली आहे. या चित्रपटावरून आधीपासूनच तणाव सुरू होता, पण आता प्रकरण प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियापर्यंत पोहोचले आहे. दोन्ही पक्षांमध्ये, अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर यांच्यात चर्चा औपचारिकपणे सुरू झाली आहे आणि पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.