China : चीनमध्ये मुलाला जन्म दिल्याबद्दल ₹1.30 लाख देणार सरकार; वन चाइल्ड पॉलिसीमुळे 7 वर्षांत जन्मदर निम्म्यावर
चीनमध्ये सरकारने मुलाला जन्म दिल्याबद्दल पालकांना १.३० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जन्मदरात सतत घट होत असल्याने सरकारने हे पाऊल उचलले आहे. चायना डेलीमधील एका वृत्तानुसार, मुलाच्या जन्मानंतर, सरकार सलग तीन वर्षे पालकांना दरवर्षी ३,६०० युआन (अंदाजे ४४,००० रुपये) देईल.