Odisha Student : ओडिशात आत्मदहनानंतर गंभीर भाजलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू; लैंगिक छळामुळे घेतले होते पेटवून
ओडिशातील बालासोर येथील फकीर मोहन ऑटोनॉमस कॉलेजमध्ये स्वतःला पेटवून घेतलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ही विद्यार्थिनी ९५ टक्के भाजली होती आणि गेल्या ३ दिवसांपासून ती भुवनेश्वरमधील एम्समध्ये जीवनमरणाशी झुंज देत होती.