Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली. तो त्याचा भाऊ अख्तर हुसैनीसह पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवत होता आणि अनेक भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करत होता.