29 महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, प्रत्यक्षात त्यात अजितदारांचा सहभाग नगण्य; फडणवीस आणि शिंदेच निर्णायक!!
29 महापौरांच्या नावांचा निर्णय घेणारे बसलेत दावोसला जाऊन; माध्यमांनी 150 + नगरसेवकांना आणले रेस मध्ये!!, असे आज दिवसभरात घडले. पण त्या पलीकडे जाऊन महापौरांच्या नावांचा निर्णय म्हणायला “महायुतीचे नेते” घेणार, पण त्यात अजितदादांचा सहभाग नगण्य असेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच निर्णायक भूमिका बजावतील.