India China : भारत-चीन सीमा वाद सोडवण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करणार; चीन रेअर अर्थ मेटल देण्यास तयार
भारत आणि चीनने सीमावाद सोडवण्यासाठी एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती शक्य तितक्या लवकर सीमांकनावर तोडगा काढेल.चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.