Jayant Patil : जयंत पाटलांची मागणी- राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकला; अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती नाही
राज्यात आलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत झालेले नुकसान पाहून पुण्या-मुंबईत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीही चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी येत्या 28 सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.