Faiz Hameed : पाकचा माजी ISI प्रमुख हमीदला 14 वर्षांची कैद; लष्करी न्यायालयाने 4 आरोपांमध्ये दोषी ठरवले
पाकिस्तानमधील एका लष्करी न्यायालयाने माजी आयएसआय प्रमुख फैज हमीदला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध सुमारे १५ महिने कोर्ट मार्शलची कारवाई चालली. सैन्याने जारी केलेल्या निवेदनानुसार, फैजवर चार गंभीर आरोपांखाली खटला चालवण्यात आला.