Raj Thackeray : राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर हरकत घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत ही परवानगी का मिळाली? का देण्यात आली? कायदा का बदलला? लोकसभा व विधानसभेला अशी मुभा का देण्यात आली नाही? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राज यांनी यावेळी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनच्या वापरावरही आक्षेप घेतला आहे. आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.