PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले- भारत 100 देशांमध्ये EV निर्यात करेल, जगाला मंद विकासातून बाहेर काढणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, भारत आता जगाला मंद विकासातून बाहेर काढण्याच्या स्थितीत आहे.ते म्हणाले की आपण साचलेल्या पाण्यात खडे फेकणारे लोक नाही आहोत. वेगाने वाहणाऱ्या प्रवाहालाही वळवण्याची ताकद आपल्यात आहे. काळाच्या प्रवाहाला दिशा देण्याची क्षमता आता भारताकडे आहे.