European : युरोपियन युनियनचा युरोपच्या 27 देशांना इशारा; रेशनचा साठा करून ठेवा, युद्धाच्या चिंतेमुळे निर्णय
युरोपीय संघटनेने(ईयू) आपल्या ४५ कोटी नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. त्यात नमूद केले की, युद्ध, सायबर हल्ले, हवामान बदल आणि महामारीच्या वाढत्या धोक्यामुळे अन्न, पाणी आणि अन्य आवश्यक सामग्रीचा कमीत कमी ७२ तासांसाठी साठा करावा. हा निर्देश युक्रेन-रशिया युद्ध, कोरोना महामारी आणि ऊर्जा संकटासारख्या अलीकडच्या घटनांमुळे दिला आहे.