Epstein सारख्या किती फाईल्स आणि रिपोर्ट्स आले आणि गेले; पण…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या स्वभावाच्या विपरीत एक राजकीय पुडी महाराष्ट्राच्या राजकीय हवेत सोडली आणि अमेरिकेतली एक फाईल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली. तिचे नाव Epstein file. या फाईल मध्ये जगभरातल्या आणि भारतातल्या अशा काही नेत्यांची नावे आहेत, की ती जर पुढच्या महिन्याभरात बाहेर आली तर भारताच्या राजकारणात भूकंप घडून थेट पंतप्रधान बदलावे लागतील, असे भाकीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुद्धा याच स्वरूपाचे भाकीत करून ठेवले. पृथ्वीराज चव्हाण यांनी Epstein file चे निमित्त करून मराठी नेत्यांना पंतप्रधान पदाचा मधाचे बोट चाटविले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांना पृथ्वीराज चव्हाण यांनी पेरलेल्या बातमीची दखल घ्यावी लागली.