Speaker Narwekar : विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय; अधिवेशन काळात केवळ आमदार, स्वीय सहाय्यक, अधिकाऱ्यांनाच प्रवेश
विधानसभा अध्यक्षांनी काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. काल झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर भूमिका घेत, हा निर्णय आज जाहीर केला.