Disha Patani : दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे ठार; गाझियाबादेत एसटीएफने केले एन्काउंटर
दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन गुन्हेगार ठार झाले आहेत. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने बुधवारी संध्याकाळी गाझियाबाद येथे झालेल्या चकमकीत त्यांना ठार मारले. त्यांची ओळख पटली ती रोहतक येथील रवींद्र आणि सोनीपत येथील अरुण अशी. दोन्ही गुन्हेगार रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळीतील होते, ज्यांच्यावर प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस होते.