Government : रेल्वे कर्मचाऱ्यांना 1866 कोटींचा दिवाळी बोनस देणार सरकार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला. आज, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांच्या उत्पादकता-लिंक्ड बोनस (PLB) ला मान्यता देण्यात आली. यासाठी १,८६६ कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले, ज्याचा फायदा १०.९१ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होईल.