Trump : ट्रम्प यू टर्न घेणार? म्हणाले- 21व्या शतकासाठी भारताशी संबंध सर्वात महत्त्वाचे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफवरून सुरू तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेकडून एक सकारात्मक संकेत मिळाला आहे. नवी दिल्लीतील अमेरिकी दूतावासाने सोमवारी म्हटले की, भारत-अमेरिका संबंध २१ व्या शतकासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. ही भागीदारी सतत नवीन उंची गाठत आहे. या महिन्यात आम्ही लोक, प्रगती आणि आपल्याला पुढे नेणाऱ्या शक्यता पुढे आणत आहोत. या विधानानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले की, दोन्ही देशांच्या लोकांमधील ही चिरस्थायी मैत्री आमच्या सहकार्याचा पाया असून याने पुढे जाण्याची ताकद मिळते, जेणेकरून आम्हाला आर्थिक संबंधांच्या अफाट शक्यतांची जाणीव होऊ शकेल.