Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या ; गाझियाबाद कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे दिले आदेश
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर एल्विश यादवच्या अडचणी वाढल्या आहेत. गाझियाबाद न्यायालयाने एल्विश यादवविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. तक्रार प्रकरणात बीएनएसएसच्या कलम १७३ (४) अंतर्गत नंदग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश अतिरिक्त दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयाने दिले आहेत.