Elvish Yadav : एल्विश यादवला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा झटका; ड्रग्ज आणि सापाच्या विषाच्या वापराबद्दल गुन्हा दाखल
युट्यूबर एल्विश यादवला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. रेव्ह पार्टीमध्ये ड्रग्ज आणि सापाच्या विषाच्या वापराच्या प्रकरणात आरोपपत्र-समन्स रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सोमवारी न्यायमूर्ती सौरभ श्रीवास्तव यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली.