Electricity : वीज नियामक आयोगाचा निर्णय- लाइट बिल 100 ते 150 रुपयांनी घटणार; एक एप्रिलपासून 7 ते 10 टक्क्यांनी कमी
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी खुशखबर आहे. एक एप्रिलपासून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक विजेचे दर ७ ते १० टक्क्यांनी कमी होणार आहेत. वीज नियामक आयोगाने याबाबतचे निर्देश दिले आहेत. महावितरणचा दरवाढीचा प्रस्ताव आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे एका घराचे लाइट बिल सरासरी १०० ते १५० रुपयांनी कमी होऊ शकते.