Mamata Banerjee : बंगालमध्ये एसआयआर विरोधात ममता बॅनर्जींचा मोर्चा; पक्षाच्या कार्यकर्त्यांसह कोलकात्याच्या रस्त्यावर उतरल्या
पश्चिम बंगालमध्ये, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी कोलकाता येथे विशेष सघन सुधारणा (SIR म्हणजेच मतदार यादी पडताळणी) विरोधात निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते ३.८ किमी लांबीच्या रॅलीत होते.