Mumbai BMC : मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख मतदारांची दुबार नावे; प्रारूप मतदार यादी जाहीर
बहुप्रतीक्षित मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच मतदार यादीतील घोळ आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. नुकत्याच २० नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. काही मतदारांची नावे चक्क १०३ वेळा नोंदवली गेल्याचेही यादीतून दिसून येते.