Electoral bonds : इलेक्टोरल बॉन्डशी संबंधित याचिका SCने फेटाळली; पक्षांचे निधी जप्त करण्याची मागणी होती
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांशी संबंधित याचिका फेटाळून लावली. याचिकेत न्यायालयाला त्यांच्या जुन्या निर्णयाचा आढावा घेण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयात राजकीय पक्षांना मिळालेले १६,५१८ कोटी रुपये जप्त करण्याची मागणी फेटाळून लावली होती.