Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे म्हणाले- दसऱ्यापासून राज-उद्धव एकत्र दिसणार, आगामी निवडणुका सोबत लढवणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात राजकीय युती निश्चित झाल्याचे संकेत ठाकरे गटाच्या नेत्याकडून मिळत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.