Eknath Khadse : एकनाथ खडसेंची स्लीप ऑफ टंग; राष्ट्रवादीच्या सभेत भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन, काँग्रेसने लगावला टोला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची चांगलीच फजिती झाली. भर सभेत भाषण करताना खडसे यांची जीभ घसरली आणि त्यांनी उपस्थितांना चक्क “भाजपला मतदान करा,” असे आवाहन केले. खडसेंच्या या विधानामुळे व्यासपीठावर आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नंतर कार्यकर्त्यांनी आठवण करून देताच खडसेंनी सारवासारव करत “तुतारीलाच मतदान करा,” अशी दुरुस्ती केली. मात्र, तोपर्यंत हे वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय बनले होते.