Trump : दोन राज्यांमधील पराभवानंतर ट्रम्प यांची टॅरिफ मुद्द्यावर माघार; बीफ आणि कॉफीवरील कर उठवले
व्हर्जिनिया आणि न्यूजर्सीमधील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शुल्क मागे घेत आहेत. ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यामध्ये बीफ, कॉफी आणि फळांसह डझनभर कृषी उत्पादनांवरील शुल्क हटवले गेले. महागाई हे यामागील एक प्रमुख कारण आहे.