Zilla Parishad Election : झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.