22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका; सगळ्यांचाच निकाल पुढे ढकलला!!
22 ठिकाणच्या निवडणूक गोंधळाचा सर्व 288 गावांमधल्या निवडणुकांना फटका बसला. कारण सर्व नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा निवडणूक निकाल मुंबई हायकोर्टाने पुढे ढकलला. आज 2 डिसेंबरला मतदान होऊन उद्या 3 डिसेंबरला निकाल लागणे अपेक्षित असताना निकालाची तारीख आता 21 डिसेंबर वर गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकारावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली.