Monsoon : केरळमध्ये मान्सूनची दमदार एंट्री; 78 सेमीपर्यंत पावसाचा अंदाज, जून-जुलैमध्येदेखील उष्णतेच्या लाटेचा इशारा
देशात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू असतानाच हवामान विभागाने केरळमध्ये यंदा जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. केरळ आणि आसपासच्या भागांत काही ठिकाणी 78 सेंटीमीटरपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे, जून आणि जुलै महिन्यांतही देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.