• Download App
    Eknath Shinde Sanjay Shirsat call | The Focus India

    Eknath Shinde Sanjay Shirsat call

    Sanjay Shirsat : राष्ट्रवादीबाबत वक्तव्याचा गैरअर्थ काढला:उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशाचे पालन करणार- मंत्री संजय शिरसाट

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. महायुतीत कोणताही वाद निर्माण होईल अशी संधी देऊ नका, असे त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांच्या या आदेशाचे तंतोतंत पालन करेन. एकनाथ शिंदे हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मला ‘सुनावले’ असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी दिलेला आदेश पाळणे हे माझे कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. यापुढे राष्ट्रवादीबाबत परिस्थितीनुसार बोलेन, पण शिंदे साहेबांना विचारूनच बोलेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Read more