Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा सवाल- विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले, केंद्र सरकारला आठ आठवड्यांच्या आत मागितले उत्तर
विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य समस्या आणि आत्महत्यांच्या घटनांना तोंड देण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कशी झाली आहे, याची माहिती आठ आठवड्यांच्या आत द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले.