Nitesh Rane : मंत्री नीतेश राणे म्हणाले – वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत?
भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करत पर्यावरणवाद्यांवर तिखट हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेली बकरी कापण्याला विरोध करताना कधीच दिसत नाहीत, असे ते म्हणालेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.