Anil Ambani : अनिल अंबानींना ईडीची लूकआउट नोटीस; 5 ऑगस्ट रोजी चौकशी, देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही
३००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी अनिल अंबानी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अंबानी यांना तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारताबाहेर जाण्याची परवानगी नाही. जर त्यांनी परदेशात प्रवास करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना विमानतळ किंवा बंदरांवर ताब्यात घेतले जाऊ शकते.