Mamata Banerjee : ममता म्हणाल्या- माझ्याकडे अमित शहांविरोधात पेन ड्राइव्ह; मला छेडाल तर सोडणार नाही
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या आयटी सेलच्या प्रमुखांच्या ठिकाणांवर गुरुवारी झालेल्या ईडीच्या छाप्यात, याच्या निषेधार्थ टीएमसी दिल्लीपासून कोलकात्यापर्यंत आंदोलन करत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीवर दोन एफआयआरही दाखल केले आहेत. त्यांनी कोलकात्यात मोर्चाही काढला.