ED office : मुंबईतील ईडी कार्यालयाला भीषण आग; चौकशीच्या अनेक फाइल्स जळून खाक
फोर्ट येथील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीत मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ईडी कार्यालयातील कागदपत्रे, फाइल्स आणि फर्निचर जळून खाक झाले. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी 9 वाजता आग नियंत्रणात आली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र चौकशी फाइल्स जळाल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.