• Download App
    ED Arrest | The Focus India

    ED Arrest

    JP Infratech : 14,599 कोटींचा घोटाळा; जेपी इन्फ्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक अटकेत, खरेदीदारांचे पैसे जेपी सेवा ट्रस्टला पाठवले

    १४,५९९ कोटींच्या कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने रिअल इस्टेट कंपनी जेपी इन्फ्राटेक लिमिटेडचे ​​माजी व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची ईडी काेठडी सुनावली. जेपी समुहातील कंपन्या जेएएल, जेआयएल यांनी घर खरेदीदारांकडून १४,५९९ कोटी रुपये वसूल केले. यातील मोठी रक्कम बांधकामाऐवजी जेपी सेवा संस्थान ट्रस्ट, जेपी हेल्थकेअर लिमिटेड व जेपी स्पोर्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड सारख्या इतर समूह कंपन्या आणि ट्रस्टमध्ये वळवण्यात आली. मनोज गौर हे जेएसएसचे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. यामुळे अपूर्ण प्रकल्प आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

    Read more