Economic Survey : संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर; जीडीपी वाढ 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले. यानुसार, आर्थिक वर्ष 26 मध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत जीडीपी वाढ 6.3% ते 6.8% राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, 2024 च्या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.4% होती, जी एप्रिल-डिसेंबर 2024 मध्ये 4.9% झाली.