PM Modi : PM मोदींना ऑर्डर ऑफ ओमान सन्मान; सुलतान हैथम यांनी केले सन्मानित; भारत-ओमानची व्यापार करारावर स्वाक्षरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमानचा दुसरा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. त्यांना सुलतान हैथम बिन तारिक यांनी ऑर्डर ऑफ ओमानने सन्मानित केले आहे.यापूर्वी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. यावेळी भारत आणि ओमान यांच्यात व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.