ECI Hits : राहुल गांधींवर निवडणूक आयोगाचा पलटवार; प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला डेटा आमचा नाही, मतचोरीच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र द्या, वा देशाची माफी मागा!
निवडणूक आयोग (EC) नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. राहुल गांधी यांचे नाव न घेता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले – पीपीटी प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला डेटा आमचा नाही. मत चोरीच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र द्या किंवा देशाची माफी मागा. जर ७ दिवसांत प्रतिज्ञापत्र प्राप्त झाले नाही तर आरोप निराधार मानले जातील.