वेद म्हणजे विज्ञानाधिष्ठित जीवनमार्ग; नागपूरात निरंजनभाई ठाकर वेद पाठशाळेचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आज नागपूर येथे स्व. निरंजनभाई ठाकर यांच्या स्मारकाचे अनावरण आणि निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.