MRSAM : नौदलाला MRSAM क्षेपणास्त्रे मिळणार, भारत डायनॅमिक्ससोबत २,९६० कोटींचा करार
देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी, केंद्र सरकारने नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. आत्मनिर्भर भारताचे ध्येय आणखी बळकट करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) सोबत २,९६० कोटी रुपयांचा मोठा करार केला आहे. भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (MRSAM) पुरवठ्यासाठी हा करार करण्यात आला आहे.