Dutch female : डच महिला पर्यटक एलिस स्पानडरमन यांनी उचलली दाल लेकच्या स्वच्छतेची जबाबदारी;
काश्मीरमधील जगप्रसिद्ध डल लेकच्या स्वच्छतेसाठी एक डच महिला पर्यटक एलिस हुबर्टिना स्पानडरमन (वय ६९) गेल्या पाच वर्षांपासून झटत आहेत. नेदरलँड्समधून आलेल्या या पर्यटकाने स्वखर्चाने, कोणतीही जाहिरात न करता आणि कोणताही मोबदला न घेता दररोज स्वतः बोट चालवत डल लेकमधील प्लास्टिक आणि इतर कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली आहे.