दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!
दसरा मेळाव्यांची सीमोल्लंघने; राजकीय लाभासाठी भाषणांची पारायणे!!, असेच आजच्या दसऱ्याच्या राजकीय मेळाव्यांचे वैशिष्ट्य ठरले. सकाळी झालेला संघाचा मेळावा हा शताब्दी मेळावा ठरला. त्यामध्ये संघ + सेवाभाव + समर्पण या विषयावर अधिक चर्चा झाली. त्याचबरोबर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्या प्रचलित झालेल्या आर्थिक नीतीचा फेरविचार करायचे आवाहन सरकारसह सर्व समाजाला केले कारण सध्याच्या प्रचलित अर्थनितीत शोषकांना शोषणाचा सुरक्षित अधिकार देण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले.